News Flash

डॉ. लहानेंना जे. जे. रुग्णालय परिसरात तात्पुरती प्रवेशबंदी

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

| February 21, 2014 12:29 pm

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणारे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना गुरुवारी न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे आदेश देत दिलासा दिला. मात्र त्याचवेळी जे. जे. रुग्णालयाच्या परिसरात आणि तेथील घरी तोपर्यंत प्रवेशासही मज्जाव केला.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बुधवारी मंगळवारी डॉ. लहाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे आदेश देत दिलासा दिला. दरम्यान, डॉ. लहाने यांनी गुन्हा रद्द करण्यासाठीही उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तत्त्पूर्वी, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. ज्या व्यक्तीचे आपल्याला नावही माहीत नाही त्याला आपण जातीवरून कशी काय शिवीगाळ करू, असा सवाल डॉ. लहाने यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र डॉ. लहाने यांनी उच्च न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायला हवा, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यावर तसे न करण्यामागील कारण डॉ. लहाने यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंगळवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 12:29 pm

Web Title: interim protection from arrest to lahane till february 25
Next Stories
1 मारियांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान
2 बेकायदा बांधकामांना आळा घालण्याच्या ‘जीपीएस’यंत्रणा बंधनकारक का नाही ?
3 मयांक गांधी बिल्डरांचे दलाल राष्ट्रवादीचा ‘आप’वर हल्लाबोल
Just Now!
X