आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधा; देश-विदेशातील नव्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी

एकेकाळी  प्राण्यांच्या कमतरता आणि नागरिकांची मंदालेली गर्दी यामुळे सुनीसुनी वाटणारी राणी बाग लवकरच गजबजणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु असून देश – विदेशातून येणाऱ्या नव्या पाहुण्या प्राण्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

राणीची बाग म्हणून सर्वश्रुत असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा लवकरच कायापालट होणार आहे. गेली दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेले नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याने नव्या प्राण्यांच्या स्वागतासाठी राणीबाग सज्ज होत आहे. या नूतनीकरणानंतर वाघ, सिंह, तरस, अस्वल यांसह आणखी काही प्राणी-पक्षी आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून उभारलेल्या अद्ययावत पिंजऱ्यांसह कात टाकलेल्या राणी बागेचे दर्शन येत्या मार्चअखेर मुंबईकरांना घडणार आहे.

यामध्ये वाघांसाठी खास रणथंबोरच्या किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे, तर सिंहासाठी गीरच्या जंगलातील कु टीप्रमाणे दिसणारा पिंजरा उभारण्यात आला आहे. बिबटय़ासाठी बनविण्यात आलेला पिंजरा हा कदाचित आकर्षणाचा विषय ठरू शके ल. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आलेल्या या ‘वायर-रोप’ पिंजऱ्यातून नागरिकांना बिबटय़ाच्या हालचाली जवळून टिपता येणार आहेत. अशा पद्धतीने उभारलेला हा भारतातातील पहिला पिंजरा असल्याचेही उद्यान संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले. तसेच मगर आणि सुसर यांसाठी खास ‘बंदिस्त स्वरूपाचे तळे‘ बांधण्यात येणार आहे.

ज्यामध्ये पाण्यात पोहणाऱ्या मगरींचे दर्शन पर्यटकांना घडणार आहे. विशेष म्हणेज प्रत्येक प्राण्याला बसण्यासाठी खास मचाण, पोहण्यासाठी छोटे तळे असे या नवीन बागेचे स्वरूप असणार आहे. तर मुक्त संचारत असलेल्या या प्राण्यामध्ये आणि नागरिकांमध्ये के वळ एक काचेचे आवरण असेल, ज्यामुळे प्राण्यांना जंगलात जाऊ न पाहिल्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. या प्रकल्पासाठी पालिके ने एकूण ११० कोटी रुपये खर्च के ले असून मार्च महिन्याच्या सुरवातीला हे नवे उद्यान मुंबईकरांना पहायला मिळेल असे सांगितले जाते.

‘मुंबईकरांसोबत अनेक परदेशी पाहुणेही राणी बाग पाहायला येतात. त्यामुळे आपली बाग आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून अधिक सुसज्ज करण्याकडे आमचा कल आहे. नूतनीकरणाचे काम साधारण फे ब्रुवारी अखेर पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्येकाला राणीच्या बागेत यावेसे वाटेल अशी बाग घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.‘ असे डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.