News Flash

मुलाखतीला बोलावून तरुणीवर बलात्कार

नोकरीसाठी मुलाखतीच्या निमित्ताने बोलावून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जुहू पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.

प्रतिनिधीक छायाचित्र

नोकरीसाठी मुलाखतीच्या निमित्ताने बोलावून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जुहू पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. साहिलसिंह अरोरा असे आरोपीचे नाव असून त्याने या तरुणीला एका बॅंकेत ‘एचआर’ व्यवस्थापक पदी नोकरी देण्याचे आमीष दाखवले होते.

जूहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या आठवडय़ात गुरुवारी विलेपार्ले येथील एका हॉटेलच्या खोलीत घडली. याबाबत पोलीस तक्रार केल्यास या प्रसंगाची चित्रफीत कुटुंबाला पाठवेन, समाजमाध्यमांवरून पसरवेन, अशी धमकी आरोपी अरोरा याने तक्रारदार तरुणीला दिली होती.

तक्रारदार तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिने आपले तपशील एका संकेतस्थळावर दिले होते. ते पाहून दिल्लीत कार्यरत असलेल्या साहिलने तरुणीशी संपर्क साधला होता व दुष्कृत्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 1:58 am

Web Title: interview girl rape akp 94
Next Stories
1 ‘आयटम’ बोलून पळणाऱ्याला महिलेनं पाठलाग करुन पकडलं, विलेपार्ल्यातील घटना
2 माहूलमध्ये नवीन स्थलांतर नाही, आहेत त्यांनाच पर्याय द्या : हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश
3 ३७० आणि राष्ट्रवाद आमच्या अजेंडाचा भाग असल्याचा अभिमान – देवेंद्र फडणवीस
Just Now!
X