‘व्हिवा लाउंज’मध्ये फंड मॅनेजर स्वाती कुलकर्णी..
गुंतवणूक म्हणजे क्लिष्ट विषय. त्यात अर्थसाक्षरताच मुळात कमी असणाऱ्या आपल्या समाजात गुंतवणूक क्षेत्रात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी; परंतु अशा परिस्थितीत हे क्षेत्र आपल्या ज्ञान आणि कर्तबगारीने काबीज करणाऱ्या आणि तब्बल ८३०० कोटींच्या समभाग संबंधित निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या स्त्रीकडून अर्थजाणीवा नव्याने विकसित करण्यची संधी मिळणार आहे. ‘यूटीआय’च्या स्वाती कुलकर्णी यांना व्हिवा लाउंजमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.
देशातील आघाडीच्या म्युच्युअल फंड मॅनेजरपकी एक असा नावलौकिक असणाऱ्या स्वाती कुलकर्णी यांच्याशी थेट संवादाचा हा कार्यक्रम मंगळवारी (दिनांक ३ नोव्हेंबर) दुपारी साडेचार वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होईल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
फंड मॅनेजरचे नेमके काम काय, गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा आणि कसा अभ्यास केला जातो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून जाणून घेता येतील.
गेली २४ वष्रे स्वाती या क्षेत्रात असून २००४ पासून फंड मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. सध्या त्यांच्याकडे यूटीआयच्या महत्त्वाचा अशा चार म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाचे काम आहे. मुंबईच्या नरसी मोनजी इन्स्टिटय़ूटमधून व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. अमेरिकेच्या सीएफए इन्स्टिटय़ूटकडून चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट म्हणून त्यांनी मान्यता मिळवली आहे.

कुठे – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई<br />कधी – मंगळवार, ३ नोव्हेंबर
वेळ – सायंकाळी ४.३०
कार्यक्रम सर्वासाठी खुला.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.