News Flash

महिला अत्याचार प्रतिबंध विधेयक सादर

‘शक्ती‘ कायद्यात समाज माध्यमांवर महिलांची बदनामी, अ‍ॅसिड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

अ‍ॅसिड हल्ला किं वा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला आणि विशेष न्यायालयांच्या स्थापनेसाठी अशी दोन विधेयके  सोमवारी विधिमंडळात मांडण्यात आली असून महिला अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी महत्त्वाचे असलेले हे कायदे मंगळवारी विधानसभेत मंजूर व्हावेत असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

‘शक्ती‘ कायद्यात समाज माध्यमांवर महिलांची बदनामी, अ‍ॅसिड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत. तर सारे खटले एका महिन्यात निकाली काढणे, प्रत्येक जिल्ह्य़ात स्वतंत्र तपास यंत्रणा आणि विशेष न्यायालये स्थापन करणे या गोष्टींसाठी असे दोन कायदे राज्य सरकार करणार आहे. त्यासाठीची दोन विधेयके  सोमवारी मांडण्यात आली.

महिला अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी ही दोन्ही विधयके  महत्त्वाची आहेत. मागील हिवाळी अधिवेशनात आम्ही त्याची घोषणा के ली होती. वर्षभर व्यवस्थित अभ्यास करून, त्यासाठी समिती नेमून सर्व वैधानिक निकषांवर टिकेल असे कायदे तयार केले आहेत. मंगळवारी हे कायदे विधानसभेत मंजूर व्हावेत असा सरकारचा प्रयत्न आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:23 am

Web Title: introduced the prevention of violence against women bill abn 97
Next Stories
1 ‘आघाडी सरकार साकारण्यात अहमद पटेल यांचा सिंहाचा वाटा’
2 देयके थकल्याने वितरकांकडून औषध पुरवठा बंद
3 कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या केबल चालकांची चौकशी
Just Now!
X