News Flash

अस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचे नियोजन कसे?

भांडवली बाजाराची अस्थिरता व गुंतवणुकीची आगामी दिशा याबाबत ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे मार्गदर्शन करतील.

(संग्रहित छायाचित्र)

दादरकरांसाठी सोमवारी गुंतवणूक मार्गदर्शन; ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे पुनर्प्रकाशन

भांडवली बाजारातील अस्थिरतेत समभाग खरेदी-विक्रीबाबतचे काय धोरण असावे? नव्या वित्त वर्षांकरिता आर्थिक नियोजन कसे व का करावे? आदी प्रशांची उकल दादरकरांना सोमवारी होईल.

‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ उपक्रमाचे दुसरे पर्व दादरकरांसाठी आयोजित करण्यात आले आहे. गुंतवणूक मार्गदर्शनाच्या निमित्ताने वार्षिकांकाचे पुनप्र्रकाशन होत आहे. एलआयसी, बँक ऑफ महाराष्ट्र, एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि मिरॅडोर रिअ‍ॅल्टी हे उपक्रमाचे पॉवर्ड बाय सहयोगी आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य आहे.

भांडवली बाजाराची अस्थिरता व गुंतवणुकीची आगामी दिशा याबाबत ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे मार्गदर्शन करतील. समभागांच्या व्यवहाराकरिता गुंतवणुकीचे धोरण कसे असावे याबाबत मार्गदर्शन करतील.

गुंतवणुकीच्या विविध पर्यायाकरिता वित्तीय नियोजन कसे करावे व ते आवश्यक कसे ठरते याबाबतचे विवेचन याप्रसंगी सनदी लेखापाल तृप्ती राणे या करतील. उत्पन्न व खर्च यांचा मेळ साधतानाच कर व महागाईवर मात करणारा परतावा मिळविण्यासाठीचे अर्थनियोजन त्या यावेळी स्पष्ट करतील.

उपस्थितांना यावेळी गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन तज्ज्ञांना प्रश्न विचारून करून घेण्याची संधी उपलब्ध आहे. यापूर्वीच्या अशा मार्गदर्शक पर्वाचा लाभ ठाणेकरांनी घेतला आहे. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असेल.

तज्ज्ञ आर्थिक नियोजनकार व मार्गदर्शक, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या वार्षिकांकाचे पुनप्र्रकाशन होईल. अर्थपूर्ण गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक ठरणारा हा सहावा वार्षिकांक आहे. तो यानिमित्ताने गुंतवणूकदारांसाठी खरेदीकरिता कार्यक्रमस्थळी उपलब्ध असेल.

कधी?

सोमवार, ४ मार्च २०१९ सायंकाळी ६ वाजता

कुठे?

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)

तज्ज्ञ मार्गदर्शक

अजय वाळिंबे – बाजार अस्थिरतेत पुढे काय?

तृप्ती राणे  – वित्तीय नियोजन का गरजेचे?

कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:25 am

Web Title: investment guidance on monday for dadarkar
Next Stories
1 जलसाठय़ात घट!
2 रस्त्यांच्या नामफलकांतून इतिहासही उलगडणार
3 बेस्ट कर्मचारी ‘ग्रॅच्युईटी’पासून वंचित
Just Now!
X