मुंबई : ‘संपत्ती निर्मिती’वर भर देणाऱ्या नव्या वित्त वर्षांच्या अर्थसंकल्पातील तरतुदीद्वारे प्रत्यक्षात बचत व गुंतवणूक कशी वाढवावी? ‘सुलभ प्राप्तीकर’ रचनेद्वारे जमा-खर्चाचे गणित कसे मांडावे? अशा अनेक प्रश्नांबाबत आज, मंगळवारी तज्ज्ञांकडून गुंतवणूकदारांना मार्गदर्शन मिळणार आहे. निमित्त आहे ते ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाच्या प्रकाशनाचे.

कधी? : सायंकाळी ६.०० वा.

कुठे? : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर

मार्गदर्शक :  अजय वाळिंबे, श्रीकांत कुवळेकर, तृप्ती राणे