08 July 2020

News Flash

अवघा राहो द्या बाजार

सेन्सेक्स १५२.३० अंश घसरणीसह २३,००२ वर, तर निफ्टी ४२.७० अंश घसरणीसह ६९८७.०५ वर स्थिरावला.

संग्रहित प्रातिनिधीक छायाचित्र

कर तरतुदीचा परिणाम; सेन्सेक्स, निफ्टीत दिवसअखेरही घसरणच

अर्थसंकल्पावर नजर ठेवत नव्या सप्ताहाची सावध सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने अर्थमंत्र्यांकडून वाढणाऱ्या करांची घोषणा जाहीर होताच दुपारपूर्वीच २२,५०० च्याही खाली लोळण घेतली. तर निफ्टीही यावेळी ७००० च्या खाली, ६९०० पर्यंत घसरला होता. दिवसअखेर दोन्ही निर्देशांक त्या प्रमाणात सावरले असले तरी शुक्रवारच्या तुलनेत त्यात घसरण नोंदली गेली.

सेन्सेक्स १५२.३० अंश घसरणीसह २३,००२ वर, तर निफ्टी ४२.७० अंश घसरणीसह ६९८७.०५ वर स्थिरावला.  सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे २३ हजार व ७ हजाराच्या काठावर होते. अर्थमंत्री जेटली यांनी अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात लाभांश कर, समभाग व्यवहार कर, कंपनी व्यवहार कर तसेच उपकर वाढल्याचे जाहीर करताच सेन्सेक्समध्ये लगेच तब्बल ६६० अंशपर्यंतची आपटी नोंदली गेली.

तर रिझव्‍‌र्ह बँक येत्या दोन दिवसात व्याजदर कपात करणार असल्याच्या चर्चेने मुंबई निर्देशांकाचा सत्रातील वरचा टप्पा शुक्रवारपेक्षा ८५० अंशांनीही उंचावला.

मंदीवाले :

वाहनांवर ४ टक्क्य़ांपर्यंत पायाभूत उपकर लागू केल्याचा परिणाम बाजारातील वाहन उत्पादक कंपन्यांच्या समभागांवर झाला. या क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग व्यवहारात ४.८८ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

मारुती सुझुकी     रु. ३२४२.६० (-४.८८)

टाटा मोटर्स       रु. ३००.२५ (-०.६५%)

महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र         रु.१२२६.८० (-०.२३%)

तेजीवाले :

शेतकऱ्यांचे उत्पन्न येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्याच्या हेतूने कृषिक्षेत्रासाठी करण्यात आलेल्या ३६,००० कोटी रुपयांच्या तरतुदीने एकूणच कृषिक्षेत्राशी निगडित समभागांचे मूल्य मात्र उंचावले.

कावेरी सीड कंपनी  रु. ३५०.८० (+३.९६%)

रेलीज इंडिया      रु. १४७.४५ (+०.८९%)

पीआय इंडस्ट्रीज    रु. ५७८.८५ (+१२.०६%)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2016 2:43 am

Web Title: investors give thumbs down to union budget 2016 sensex ends 152 points down
टॅग Share Market
Next Stories
1 उदंड जाहले पाणी..
2 शेतकऱ्यांची पुन्हा दिशाभूल!
3 पायाभूत सुविधांसाठी सकारात्मक अर्थसंकल्प!
Just Now!
X