News Flash

‘आयफोन टेन’साठी रीघ

आठवडाभरापूर्वी एक लाख दोन हजार रुपयांच्या या फोनची पूर्वनोंदणी करण्यात आली होती.

संगणक, टॅब, आयपॅड याला खऱ्या अर्थाने पर्याय ठरणारा अ‍ॅपलप्रेमींसाठी बहुप्रतीक्षित ‘आयफोन टेन’ अखेर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता भारतीय बाजारपेठेत दाखल झाला. यामुळे भारतीय बाजारपेठेत प्रथमच एक लाखापेक्षा जास्त किमतीचा फोन उपलब्ध झाला आहे. हा फोन घेण्यासाठी देशातील अ‍ॅपलच्या दुकानांमध्ये रीघ लागली होती.

आठवडाभरापूर्वी एक लाख दोन हजार रुपयांच्या या फोनची पूर्वनोंदणी करण्यात आली होती. यासाठी दहा हजार रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकसोबतच रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या संकेतस्थळावर शुक्रवार संध्याकाळी सहा वाजल्यापासून शनिवार सकाळी सात वाजेपर्यंत फोन खरेदी केल्यास कॅशबॅक देऊ केले आहे. भारतासह जगभरात हा फोन एकाच वेळी बाजारात दाखल झाला आहे. या फोनच्या ६४ जीबी साठवणूक क्षमता असलेल्या आवृत्तीची किंमत ८९ हजार रुपये आहे; तर २५६ जीबी साठवणूकक्षमता असलेल्या फोनची किंमत एक लाख दोन हजार रुपये इतकी आहे. हा फोन चंदेरी आणि करडय़ा रंगांत उपलब्ध आहे.

या फोनमुळे मागच्या महिन्यात भारतीय बाजारात दाखल झालेल्या आयफोन आठ आणि आयफोन आठ प्लसच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. आयफोन आठची ६४ जीबी साठवणूकक्षमता असलेली आवृत्ती ६४ हजार रुपयांना तर २५६ जीबी क्षमता असलेली आवृत्ती ७७ हजार रुपयांना उपलब्ध आहे. तर आठ प्लसची ६४ जीबी साठवणूकक्षमता असलेली आवृत्ती ७३ हजार रुपयांना तर २५६ जीबी क्षमता असलेली आवृत्ती ८६ हजार रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन दहाची किंमत एक लाखापेक्षा जास्त झाल्यामुळे याचदरम्यान बाजारात दाखल झालेल्या पिक्सेल २एक्सएल या फोनच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या पूर्वनोंदणीत कमालीची वाढ झाली आहे. या फोनची किंमत ७३ हजार रुपये इतकी आहे.

काय आहे आयफोन टेनमध्ये?

आयफोन दहा हा कंपनीचा पहिलाच संपूर्ण स्क्रीन असलेला स्मार्टफोन आहे. यामध्ये ५.८ इंचांचा रेटिना डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये चेहऱ्याची ओळख, वायररहित चार्जिगची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन पाणी आणि धूळरोधक आहे. फोनमध्ये बारा मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये डय़ुएल ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनची सुविधा देण्यात आली आहे. याचबरोबर कॅमेराची रंगसंगती आणि पिक्सेल सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे. या फोनमध्ये सात मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ए११ बायोनिक प्रोसेसर वापरण्यात आला आहे. ज्यामुळे या फोनमध्ये मशीन लर्निग, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, थ्रीडी गेमिंगसारख्या गोष्टी वापरणे शक्य होणार आहे. फोनमध्ये आयओएस ११ देण्यात आली असून रॅम ३ जीबी आहे. बॅटरी क्षमता २७१६ एमएएच इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 2:46 am

Web Title: iphone 10 launch in india
Next Stories
1 ऑनलाइन मूल्यांकनाची जबाबदारी आता एकाच कंपनीवर
2 गरीब नगरातील बेकायदा झोपडय़ांवर कारवाई
3 शाखा ताब्यात घेण्यासाठी भाजप-सेना कार्यकर्ते भिडले
Just Now!
X