31 May 2020

News Flash

क्रिकेट सट्टा प्रकरणात दिग्दर्शक साजिद खान याचेही नाव

सात वर्षांपूर्वी सट्टा खेळल्याचा दावा सोनूने केला आहे.

दिग्दर्शक साजिद खान

क्रिकेट सट्टाप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केलेल्या सोनू जालान यांच्या चौकशीतून दररोज नवनवीन नावे पुढे येत असतानाच आता अभिनेता अरबाज खानपाठोपाठ चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनी सात वर्षांपूर्वी सट्टा खेळल्याचा दावा सोनूने केला आहे. मात्र हे जुने प्रकरण असल्याने त्याचे पुरावे पोलिसांना मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या तरी कोणतीच कारवाई होणार नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोनू जालान याने चौकशीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे खंडणीविरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी अरबाज खान याची चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. त्यापाठोपाठ क्रिकेट सट्टा प्रकरणात चित्रपट निर्माता पराग संघवी आणि पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ समीर बुद्धा यांची नावे पुढे आली होती. या दोघांनाही पोलिसांनी समन्स बजावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 2:55 am

Web Title: ipl betting case filmmaker sajid khan
Next Stories
1 Afghanistan vs Bangladesh 2nd T20 : रशीदच्या फिरकीची कमाल, अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत जिंकली मालिका
2 ‘वाद’ टाळण्यासाठी सायना, सिंधूचा वेगवेगळ्या अकादमीत सराव
3 सॅचिनाटोचा रोमहर्षक विजय!
Just Now!
X