News Flash

आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारा अटकेत

आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मालाड परिसरातून बुधवारी अटक केली.

आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारा अटकेत
IPL (संग्रहित)

मुंबई : आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मालाड परिसरातून बुधवारी अटक केली. संदीप मदनराज दोषी (४१) असे या बुकीचे नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर संदीप सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालाड येथील मार्वे रस्त्यावरील गंगा सोसायटीतील सदनिकेवर छापा घालून संदीपला अटक केली. त्याच्याकडून एक मोबाइल फोन, बेटिंग आयडी आणि टीव्ही सेट पोलिसांनी जप्त केला आहे. संदीप हा ‘लोटस बुक २४७’, ‘एबीईएक्ससीएच’, ‘प्लेविन २४७’ या तीन अ‍ॅपच्या माध्यमातून सट्टा लावत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 2:07 am

Web Title: ipl match crime fraud arrest speculation akp 94
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या ‘कुटुंबा’तील नगरसेवकच बेजबाबदार
2 मुंबई विद्यापीठातील ग्रंथसंपदेचे तीनतेरा
3 ऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई
Just Now!
X