News Flash

आयपीएस अधिकाऱ्याला सरकारकडून निर्दोषत्व

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारिया यांच्या खून प्रकरणाशी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ए. के. शर्मा यांचा तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा राज्य सरकारतर्फे

| March 27, 2014 05:36 am

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारिया यांच्या खून प्रकरणाशी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ए. के. शर्मा यांचा तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा राज्य सरकारतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.
खटल्यातील मुख्य व फरारी आरोपी अनुराग गर्ग आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी ए. के. शर्मा यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणाची चौकशी केली की नाही याची केस डायरी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळेस मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास व न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी केतन तिरोडकर यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी शर्मा किंवा अन्य कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी संबंध
नसल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 5:36 am

Web Title: ips officer acquit in loharia murder case
Next Stories
1 बिना अधिकार फुल्ल पगार!
2 दादरमधील शाळेच्या शुल्कवाढीला पालकांचा विरोध
3 खड्डय़ांच्या सफरीसाठी तयार राहा..
Just Now!
X