News Flash

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर NCB च्या ताब्यात!

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला NIA नं ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थ प्रकरणी त्याची चौकशी केली जाणार आहे.

दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर एनसीबीच्या ताब्यात

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला मुंबई एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीनं ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरापासून मुंबईतील ड्रग्ज रॅकेट आणि त्यामागे असणाऱ्या अनेक मोठ्या नावांची चौकशी एनसीबीकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आज एनसीबीनं इकबाल कासकरला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीरमधील एका अंमली पदार्थ प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

 

जम्मू-काश्मीरहून पंजाबमध्ये जवळपास २५ किलो चरस आणण्यात आलं होतं. हे चरस तिथून मुंबईमध्ये वितरीत केलं जाणार होतं, असा संशय एनसीबीला असून त्यासंदर्भात इक्बाल कासकरची चौकशी केली जाणार आहे. याआधी देखील इकबाल कासकरविरोधात ईडी अर्था अंमलबजावणी संचलनालयाने खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 3:47 pm

Web Title: iqbal kaskar underworld don dawood ibrahim brother detained by mumbai ncb pmw 88
टॅग : Dawood,Dawood Ibrahim
Next Stories
1 “मुंबई महापालिकेला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे”
2 “ही दुर्दैवाची बाब”, मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ निर्णय स्थगित केल्यानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!
3 ‘आशा’ सेविकांना मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळणार; आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे!
Just Now!
X