News Flash

“लसीकरण केंद्रांवरील राजकीय बॅनर्स काढा”; मुंबई मनपा आयुक्तांनी दिला आदेश!

लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे येत आहेत, असं देखील सांगितलं आहे.

“लसीकरण केंद्रांवरील राजकीय बॅनर्स काढा”; मुंबई मनपा आयुक्तांनी दिला आदेश!
संग्रहीत छायाचित्र

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी गुरूवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना, लसीकरण केंद्रांवर लावले गेलेले राजकीय बॅनर्स व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले. लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे येत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी जाहिरातबाजी रोखण्याची तंबी दिली आहे. अशा प्रकारच्या अनुचित जाहिराती करणे हे वस्तुस्थिती व सौजन्याला धरून योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या या वर्तनाचा समाचार घेतला आहे.

लसीकरण केंद्रांवर नगरसेवक, आमदार, खासदार किंवा अन्य कुणाकडून लावण्यात आलेल्या जाहिराती, बॅनर्स किंवा होर्डिंग्ज विनंती करूनही उतरवले जात नसतील तर ते काढले जावेत. असं मनपा आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे. तसेच, मुंबई मनपाकडे अशा बॅनर्स व होर्डिंग्ज संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. असं मनपा आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुंबईत ३२३ अॅक्टिव्ह कोविड लसीकरण केंद्र असून, ज्यामधील ७९ खासगी रूग्णालयात व २० शासकीय रूग्णालयात आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक वार्डात किमान एक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, लस तुटवड्यामुळे मनपाने गुरूवारी लसीकरण मोहीम स्थगित केली होती. मुंबईत आतापर्यंत ३३,७४,२६१ जणांचे लसीकरण झाले आहे. बुधवारी जवळपास ४९ हजार ८३३ डोस दिले गेले.

लसीकरणाआड राजकीय प्रचार

फे ब्रुवारी २०२२ मध्ये पालिके च्या निवडणुका होणार असून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम त्यातील प्रचाराचा भाग होऊ लागला आहे. पालिके ने मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण के ंद्रे सुरू के ली आहेत. या लसीकरण केंद्रांच्या बाहेर लसीकरण सुरू आहे किं वा नाही या फलकापेक्षाही आधी एखाद्या राजकीय पक्षाचा किं वा नेत्याचा फलक नजरेस पडतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 6:18 pm

Web Title: iqbal singh chahal directed to remove political banners from vaccination centres msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “पाठीत खंजीर खुपसला गेला होता, त्यावेळच्या भावनेतून…!” ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा!
2 मनसे भाजपा युती होणार का?; फडणवीस म्हणाले, “मनसेने हिंदुत्व…”
3 पालिकेच्या चार नव्या जम्बो करोना रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग!