01 March 2021

News Flash

रेल्वे स्टेशनवर आता तिकीट मशीनबरोबरच पिझ्झा मशीनही

IRCTC द्वारे मिळणार अनोखी सुविधा

ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला अचानक भूक लागली आणि तुम्हाला स्टेशनवरच पिझ्झा मिळाला तर? ऐकूनही आनंदाची वाटेल अशी ही गोष्ट आता प्रत्यक्षात घडणार आहे. भारतीय रेल्वेने आधुनिकीकरण करायचे ठरवल्याने त्याअंतर्गत हे करण्यात आले आहे. आयआरसीटीसीने ही सुविधा मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर करण्यात आली आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे मशीन ऑटोमॅटीक असेल असे सांगण्यात आले आहे. आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिल्यानंतर प्रवाशांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडियोही देण्यात आला आहे. तसेच हा पिझ्झा अतिशय कमी किंमतीत मिळणार आहे.

आपली ऑर्डर देण्यासाठी ग्राहकांना या मशीनमध्ये आधी कॉईन घालावे लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला पिझ्झा मिळू शकेल. यामध्ये फ्रेश पिझ्झा बेस तयार केला जाणार आहे. मग त्यावर सॉस आणि टॉपिंग्जच्या माध्यमातून पिझ्झा तयार होणार आहे. त्यानंतर तो आपल्यासमोर ओव्हनमध्ये बेक होऊन येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला रेल्वे स्टेशनवर भूक लागली तर हा एक उत्तम उपाय उपलब्ध असेल. याप्रमाणेच फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न, आईसक्रीम आणि फ्रूट ज्यूस यांचीही मशीन लवकरच दाखल होतील असे सांगण्यात आले आहे. सध्या रेल्वेमध्ये ती पुढील स्टेशनला पोहोचायच्या आधी दोन तास डॉमिनोजला पिझ्झाची ऑर्डर द्यायची सुविधा उपलब्ध आहे. हा पिझ्झा थेट तुमच्या सीटवर येऊन तुम्हाला मिळतो. दूरच्या प्रवासासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. मुंबईत सुरुवातीला ही पिझ्झाची सुविधा मुंबई सेंट्रल स्थानकावर मिळत असली तरी कालांतराने इतरही स्टेशनवर ही सुविधा मिळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 5:13 pm

Web Title: irctc launches pizza vending machine in mumbai station mumbai central
Next Stories
1 शशांक राव यांनी फक्त माथी भडकवण्याचं काम केले; शिवसेनेचा पलटवार
2 प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय!-पूनम महाजन
3 डान्सबारप्रकरणी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल होणार
Just Now!
X