‘सव्‍‌र्हर’मध्ये बिघाड, तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉपरेरेशनची (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट आरक्षण सेवा गुरुवारी सकाळी दोन तास ठप्प झाली. त्यामुळे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.                                          गेल्या काही दिवसांपासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणी येत आहेत. गुरुवारी  सकाळी नऊपासून आयआरसीटीसीचे संकेतस्थळ दोन तास ठप्पच झाले. संकेतस्थळावर जाऊन प्रवाशांनी  तिकीट काढण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक कामांसाठी बंद असल्याचे दाखवत होते. या संदर्भात आयआरसीटीसीचे प्रवक्ता सिद्धार्थ सिंग यांनी सांगितले की, सव्‍‌र्हरमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवली होती. मुंबईतच नव्हे तर सर्वच ठिकाणी संकेतस्थळाला अडचण येत होती. सकाळी ११ नंतर सव्‍‌र्हरमधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर संकेतस्थळ पूर्ववत झाले.