News Flash

सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करची आत्महत्या

डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

विदर्भातील गोसिखुर्द सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस तपास करीत आहेत. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मंगळवारी सायंकाळी ठक्कर काही कामानिमित्त नरिमन पॉइंट येथे आला होता. साधारण ६.३० वाजताच्या सुमारास त्याने चालकास गाडी रस्त्याशेजारी उभी करण्यास सांगितले. चालकाला गाडीबाहेर पाठवले व तो स्वत: आत थांबला. काही वेळातच त्याने आपल्याकडील परवाना असलेल्या रिव्हॉलवरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून चालकाने गाडीचे दार उघडले. मालकाला गोळी लागून पडलेला पाहून घाबरलेल्या चालकाने पोलिसांना घटनेची माहिती कळवली. जी. टी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मरिन ड्राइव्ह पोलिसांना जिगर ठक्करच्या गाडीतून सिंचन घोटाळ्यासंदर्भातील काही कागदपत्रे सापडली असून त्याचा तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 7:04 am

Web Title: irrigation scam accused jigar thakker commites suicide
Next Stories
1 वेतनखर्च नियंत्रणासाठी सरकारी नोकऱ्यांना कात्री!
2 नोटाबंदीनंतर केंद्राकडून जिल्हा बँकांच्या माथी ११२ कोटींचा तोटा
3 भलत्याच डॉक्टरकडून निदान, खर्च वाढवण्यासाठी दबाव..
Just Now!
X