पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन यांना बुधवारी कनिष्ठ न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. राज कुंद्राची जामीन याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली. यावेळी राज कुंद्राच्या वकिलाने कोर्टाला कोणत्या आधारे राज कुंद्राचा जामीन नाकारला जात असल्याची विचारणा केली. ‘तो दहशतवादी आहे का?,’ अशी विचारणाही कोर्टाकडून करण्यात आली. यावर सरकारी वकिलांनी त्याने सर्व डिजिटल पुरावे नष्ट केले असल्याचं म्हटलं.

राज कुंद्राला गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आली होती. मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर कुंद्राने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने बुधवारी त्याच्या अर्जावर युक्तिवाद ऐकला. कुंद्रा हा काही दहशतवादी नाही. शिवाय या प्रकरणी आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे असून सहआरोपी जामिनावर बाहेर आहेत, असा दावा कुंद्राच्या वतीने जामिनाची मागणी करताना केला गेला.

former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Delhi Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल

तर अश्लील चित्रपट निर्मितीत तरुणींना बळजबरीने आणले जात होते. त्यामुळे कुंद्राला जामीन दिल्यास या तरुणींवर पुन्हा दबाव टाकून तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. तसंच कुंद्राला जामीन न देण्याची विनंती केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर पोलिसांचे म्हणणे मान्य केले व जामीन देण्यास नकार दिला.

दरम्यान, कुंद्राने अटकेबाबत उच्च न्यायालयात याचिका केली असून त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. राज कुंद्राने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असून तात्काळ सुटका केली जावी अशी मागणी केली आहे.

अश्लील चित्रफितींच्या प्रकरणात आणखी एक गुन्हा

अश्लील चित्रफितींच्या प्रकरणात एका नवोदित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेबसीरिजच्या नावाखाली अश्लील चित्रफितींचे चित्रण करून ते प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आरोपींनी मढ बेटावरील आणि लोणावळ्यातील बंगल्यात अभिनेत्रीला चित्रीकरण करण्यास भाग पाडले.हॉटशॉट, न्यूफ्लिक्स आणि गुपचूप अ‍ॅपसाठी तिच्याकडून ५ चित्रफितींचे चित्रण करून घेण्यात आले. अभिनेत्रीचा चेहरा न झाकताच तिच्या पूर्वपरवानगीविनाच या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या.