भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी लग्नानंतर जवळपास 452 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहणार आहे. मुंबईतील वरळीमधील 50 हजार स्क्वेअर फीट जागेवर असणाऱ्या या बंगल्याचं नाव ओल्ड गुलीटा आहे. बंगल्यातून सुंदर समुद्र किनाऱ्याचं दर्शन होणार आहे. तसंच इतरही काही विशेष सुविधा उपलब्ध आहेत. येत्या १२ डिसेंबर २०१८ रोजी इशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत. आनंद पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आहे.

भारतीय संस्कृती, परंपरेनुसार विवाहसोहळा पार पडणार आहे. अंबानी कुटुंबाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे विवाहाची तारीख जाहीर करण्यात आली होती. लग्नाला कुटुंबीय आणि निवडक मित्र परिवार उपस्थित असणार आहे.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अजय पिरामल यांनी हा बंगला 2012 रोजी हिंदुस्तान युनीलिव्हरकडून 452 कोटींना खरेदी केली होता. त्यांनी हा बंगला आपला मुलगा आणि होणाऱ्या सुनेसाठी भेट म्हणून दिला आहे. या बंगल्यात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लग्नानंतर इशा आणि आनंद पिरामल ओल्ड गुलीटामध्ये शिफ्ट होतील.

आनंद आणि इशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंबियांचे सुमारे ४० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. पिरामल रिअल्टीपूर्वी आनंदने ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची स्थापना केली होती.

सध्या या माध्यमातून एका दिवसांत ४० हजारहून अधिक रूग्णांची तपासणी केली जाते. आनंद इंडियन मर्चंट चेंबर-यूथ विंगचा सर्वांत युवा अध्यक्षही राहिला आहे. इशा अंबानी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मंडळाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमधून पदवी मिळवली आहे.