धवल कुलकर्णी

संपूर्ण जगाला ग्रासणाऱ्या करोना रोगाचा फैलाव मुंबईमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून बृहन्मुंबई महानगरपालिका युद्धपातळीवर उभारता येतील अशा आयसोलेशन वॉर्ड साठी जागा शोधून ठेवत आहे.

हे वॉर्ड रिकाम्या इमारती, फार वापरात नसलेल्या रुग्णालयांमध्ये गरज पडल्यास फक्त दोन दिवसांमध्ये उभारण्याचा मानस असल्याबाबतची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

हे आयसोलेशन वॉर्ड रिकाम्या इमारतीमध्ये किंवा वापरात नसलेल्या इमारतींमध्ये स्थापन करण्यात येऊ शकतात. गरज पडल्यास हे वॉर्ड अवघ्या दोन दिवसांमध्ये उभारता येतील अशी सोय महानगरपालिकेकडून करण्यात येईल. शिवडी येथील Acworth लेप्रोसी हॉस्पिटलचा वापरही यासाठी होऊ शकतो.

सध्या कोरोनाच्या रुग्णांना व संशयितांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले असून तशी सुविधा उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.