22 September 2020

News Flash

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील कवितेवरुन वाद; आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान

संबंधीत कवितेतील ओळींमधून विविध प्रकारे पाण्याला उपमा देण्यात आली आहे. अशाच एका ओळीत अश्लिल विधान असून त्याला आदिवासी मुलीचा संदर्भ देण्यात आला आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

मुंबई विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेत आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान असल्याचा दावा आदिवासी महासंघाने आणि काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याप्रकरणी काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच या तक्रारीत कवी दिनकर मनवर यांच्यासह प्रकाशकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कवि दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या काव्यसंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएच्या मराठीच्या पुस्तकात आहे. या कवितेतील ओळींमधून विविध प्रकारे पाण्याला उपमा देण्यात आली आहे. अशाच एका ओळीत अश्लिल विधान असून त्याला आदिवासी मुलीचा संदर्भ देण्यात आला आहे. हे लिखाण समाजाच्याच नव्हे तर समस्त महिलांच्या भावना दुखावणारे असल्याने ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी या तक्रारीची दखल घेतली असून अभ्यासक्रम मंडळाची लवकरात लवकर बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यावर तोडगा निघण्याची आशा आहे. मात्र, तरीही याप्रकरणी मुंबई विद्यापीठाला जाब विचारण्यासाठी सोमवार, १ ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 3:09 pm

Web Title: issues relating to poetry in the university of mumbai objectionable statement about tribal women
Next Stories
1 ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन
2 राफेलबाबत मोदींना क्लिन चिट देऊन पवारांनी दुटप्पीपणा दाखवला-प्रकाश आंबेडकर
3 Rafael Deal : ..तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिलं नाही – तारिक अन्वरांचा प्रश्न
Just Now!
X