अभियंता इस्थर अनुया हत्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या रिक्षाचालकांची कसून तपासणी सुरू आहे. पोलिसांना अद्याप ठोस पुरावे मिळालेले नसले तरी लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असा विश्वास सुत्रांनी व्यक्त केला.
 इस्थर अनुह्य़ाच्या हत्या प्रकरणात कसलेच धागेदोरे मिळत नसल्याचे पोलिसांवरील दबाब वाढला आहे. पोलिसांनी तीन रिक्षा चालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जबाबात विसंगती आढळली आहे. पण पोलीस ठोस पुरावे जमा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहभाग आहे की नाही ते स्पष्ट करता येत नाही. त्यांच्या डिनएन नमुने तपासणीनंतर अधिक प्रकाश पडेल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलीस सर्व शक्यता पडताळून तपास करत असून काही पोलीस पथके राज्याबाहेरही गेली आहेत.  इस्थर अनुह्य़ा ही २३ वर्षीय अभियंता तरूणी ५ जानेवारी पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बेपत्ता होती. काही दिवसांनी तिचा मृतदेह कांजूर महामार्गाजवळील झुडपात आढळला होता.