News Flash

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प मोदी सरकारच्या स्वप्नांचा जाहीरनामा – मुख्यमंत्री

या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण प्रतिक्रिया या तितक्याशा समाधानकारक नाहीत. मात्र, सत्ताधारी पक्षांकडून या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण प्रतिक्रिया या तितक्याशा समाधानकारक नाहीत. मात्र, सत्ताधारी पक्षांकडून या अर्थसंकल्पाची स्तुतीच करण्यात आली आहे. दरम्यान, हा मोदी सरकारच्या स्वप्नांचा जाहीरनामा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.


अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, मॅक्रोइकॉनॉमिक पातळीवर हा एक दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प आहे. याला कोणी भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पंतप्रधानांनी बाळगलेल्या स्वप्नांचा जाहीरनामाही म्हणू शकेल. तसेच हा गाव, गरीब आणि शेतकरी यांच्यामध्ये रुपांतरण घडवून आणण्याचे ध्येय असलेला अर्थसंकल्प आहे.


फडणवीस यांच्याप्रमाणेच हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला उभारी देणारा असल्याचे मत केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात आम्ही आधीच अर्थव्यवस्था दुप्पट केली आहे. त्यानंतर आता मला निश्चित खात्री वाटते की, ज्यावेळी आम्ही पुढील पाच वर्षे पूर्ण करु तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ही ५ ट्रिलिअन डॉलर इतकी झालेली असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 3:41 pm

Web Title: it is a manifestation of pms dream says cm fadnvis aau 85
Next Stories
1 मुंबई तुंबली तेव्हा तुम्ही कुठे होता? राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर संतापले
2 औषधनिर्माणशास्त्राचे ७० टक्के पदवीधर बेरोजगार
3 दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयला सहकार्य न करणाऱ्या राज्य सरकारला न्यायालयाने फटकारले
Just Now!
X