News Flash

..तर १ हजार वर्षे राम मंदिर होणार नाही: संजय राऊत

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

खासदार संजय राऊत

राम मंदिर निर्मितीवरुन सध्या देशात राजकीय वादळ उठले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणाची सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित केल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली असून न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या भेटीची पूर्ण तयारी झाली आहे. येत्या २५ नोव्हेंबरला ते अयोध्येला जाणार आहेत. तिथे जाऊन ते मोदीजींना आणि भाजपा सरकारला राम मंदिराच्या आश्वासनाची आठवण करुन देणार आहेत, असे त्यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले.

राम मंदिराच्या उभारणीसाठी आता केंद्र सरकारनेच भूमिका घ्यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांकडून होत आहे. केंद्र सरकारने मंदिर उभारणीसाठी लवकरात लवकर कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी संसदेत खासगी विधेयक आणणार असल्याचे सांगितले आहे. सिन्हा यांनी राम मंदिराबाबत विरोधी पक्षांनाही त्यांच्या भूमिकेविषयी विचारले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते खासगी विधेयक आणण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:01 pm

Web Title: it will take 1000 years if we wait for courts verdict on ram temple says sanjay raut
Next Stories
1 मुंबई पोलीस दलातून ‘हिना’ आणि ‘विकी’ सेवानिवृत्त
2 ‘सामना’च्या आगीशी खेळू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा
3 रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकार संघर्ष विकोपाला
Just Now!
X