News Flash

महाआघाडीचं तीनचाकी सरकार चालणं कठीण – फडणवीस

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुमताच्या चाचणीपूर्वीच देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले आहे.

संग्रहीत

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुमताच्या चाचणीपूर्वीच देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकार कोसळल्याची माहिती दिली तसेच नव्या सरकारला शुभेच्छा देताना महाआघाडीचं तीनचाकी सरकार चालणं कठीण असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, “नवे सरकार स्थापन करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल. कालच मी बघितलं जेव्हा शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते. सत्तेसाठी किती मोठी लाचारी शिवसेनेच्या नेत्यांना स्विकारावी लागली आहे. पण त्यांची लाचारी त्यांना लखलाभ. भाजपा आता राज्यात प्रखर विरोधीपक्षाचे काम करेन. जनतेचा आवाज बनून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करु.”

आणखा वाचा- अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

इतका मोठा विरोधाभास असल्याचे सरकार राज्यात सत्तेत येणार आहे. दोन चाकं असणारं वाहन धावतं पण तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असणाऱ्या या सरकारची चाकं तीन दिशेला धावली तर काय होईल? असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 4:07 pm

Web Title: its difficult to run a three wheeler government says fadnavis aau 85
Next Stories
1 सदानंद सुळे यांच्या मनधरणीनंतर अजित पवारांनी दिला राजीनामा?
2 तीन वर्षानंतर पुन्हा विचारलं तरी नाकारला लग्नाचा प्रस्ताव, बोरिवलीत विवाहित तरुणीवर चाकूने हल्ला
3 सर्वाधिक वेळा निवडून आल्याने हंगामी अध्यक्षपदासाठी माझा विचार व्हावा – थोरात
Just Now!
X