पत्रकार ज्योतिर्मय डे तथा जे. डे हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवले आहे. तर पत्रकार जिग्ना वोरा यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. जे. डे हत्याप्रकरण नेमके आहे तरी काय याचा घेतलेला आढावा…

११ जून २०११ रोजी जे डे यांची हत्या
पवईतील हिरानंदानी परिसरात राहणारे जे. डे हे ११ जून २०११ रोजी घाटकोपर येथे राहणाऱ्या आईला भेटून दुपारी घरी परतत होते. त्याच वेळी मोटारसायकलवरुन चार हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते. जे डे हे पवईतील विल्सन इमारतीजवळ पोहोचले असता हल्लेखोरांनी त्यांना गाठले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर नऊ गोळ्या झाडल्या आणि तिथून पसार झाले. या गोळीबारात जे. डे यांच्या छातीत तीन आणि तर डोक्यात एक गोळी लागली. यात गंभीर जखमी झालेल्या जे. डे यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

कोण होते जे. डे?
जे. डे हे २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. गुन्हेविषयक शोधपत्रकारितेसाठी ते ओळखले जायचे. गुन्हेगारी विश्वाचा शोध घेणारी ए टू झेड अंडरवर्ल्ड आणि झिरो डायल ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली होती. इंडियन एक्स्प्रेसमध्ये कार्यरत असताना त्यांचे ‘नोट फ्रॉम दी अंडरवर्ल्ड’ हे गुन्हेविषयक सदर गाजले होते. अंडरवर्ल्डमधील टोळ्यांची खडान खडा माहिती त्यांना होती.

सीबीआयकडे तपास
जे. डे यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ती पाहता यात एखाद्या टोळीचा हात असावा, असा संशय सुरुवातीपासूनच होता. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

जे. डेंचे मारेकरी कोण?
छोटा राजनच्या इशाऱ्यावरून जे. डे यांची हत्या करण्यात आल्याचे तपासातून समोर आले. जे डे यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण १२ आरोपींना मोक्कान्वये गजाआड केले गेले. त्यात पत्रकार जिग्ना वोरा यांचाही समावेश होता. सतीश काल्या, अनील वाघमोडे, अभिजीत शिंदे, नीलेश शेडगे, अरुण डोके, मंगेश आगावणे, सचिन गायकवाड या आरोपींचा डे यांच्या हत्येत थेट सहभाग होता. राजनचा बालपणीचा मित्र विनोद असरानी ऊर्फ विनोद चेंबूर याने मुलुंडच्या एका बारमध्ये डे यांची ओळख पटवून दिली. पॉलसन जोसेफ आणि रवी रत्तेसर यांनी आरोपींना ग्लोबल सिमकार्ड पुरवली, आर्थिक मदतही केली. तर डे यांच्या विरोधात राजनचे माथे भडकावण्याचे काम जिग्नाने केले, असा आरोप होता. मात्र, जिग्ना यांची या आरोपातून न्यायालयाने सुटका केली आहे.

छोटा राजनविरोधात हे ठरले महत्त्वाचे पुरावे
जे. डे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विनोद चेंबूरचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हा राजनने चेंबूरमधील एका मित्राला फोन करून विनोदबाबत चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्याने डे याची हत्या का, कशासाठी केली याची सविस्तर माहिती दिली. ते संभाषण गुन्हे शाखेने रेकॉर्ड केले होते. हत्येनंतर लगेचच राजनने मुंबईतील काही पत्रकारांना फोन करून गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारली होती. हेच राजनविरोधातील महत्त्वाचे पुरावे ठरले.