20 November 2019

News Flash

गिरीश महाजनांनी जामनेर जिंकून दाखवलं, नगरपालिकेवर एकहाती सत्ता

जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अंजना पवार यांचा पराभव केला.

गिरीश महाजन

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाने सर्वच्या सर्व २५ जागा जिंकत इतर पक्षांना धोबीपछाड दिला आहे. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.

त्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अंजना पवार यांचा तब्बल आठ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. गत निवडणुकीत पहिली अडीचवर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती जामनेर नगरपंचायतीची सत्ता होती. त्यानंतर अन्य सदस्यांच्या पाठिंब्याने साधन महाजन नगराध्यक्ष झाल्या.

यावेळी गिरीश महाजन यांनी पूर्ण राजकीय ताकत पणाला लावून सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या. या विजयामुळे महाजन यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील वजन अधिक वाढणार असून सरकारमधील स्थानही भक्कम होणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण ही महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे.

First Published on April 12, 2018 12:54 pm

Web Title: jamner election girish mahajan
Just Now!
X