06 July 2020

News Flash

जान्हवी गडकरला जामीन मंजूर

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जान्हवी गडकर हिला बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

| August 5, 2015 12:27 pm

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जान्हवी गडकर हिला बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. जान्हवीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यापूर्वी दोनवेळा तिचा जामीन अर्ज महानगरदंडाधिकाऱयांनी फेटाळला होता.
मद्यधुंद अवस्थेत पूर्व द्रुतगती महामार्गावर बेदरकार व भरधाव गाडी चालवून एका टॅक्सीला जान्हवीने धडक दिली होती. या धडकेत टॅक्सी चालकासोबत एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जान्हवीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर तिने जामिनासाठी अर्ज केला होता. तिला भायखळा येथील कारागृहात ठेवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2015 12:27 pm

Web Title: janhavi gadkar gets bail
Next Stories
1 ‘राष्ट्रहितासाठी हिंसा समर्थनीय’
2 चार जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती मॅटकडून रद्द
3 रवींद्र लाड यांचे निधन
Just Now!
X