फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या लुपिन लिमिटेडने (लुपिन) मुंबईतील रहिवाशांसाठी ‘मन का स्वास्थ्य, तन की सुरक्षा’ या अंतर्गत ‘जन कोविड’ हेल्पलाइन (1800-572-6130) सुरू केल्याचे आज जाहीर केले आहे.

लॉकडाउन सुरू असताना वैद्यकीय मदत मिळवणे, हे मोठे आव्हान आहे. या उपक्रमामुळे, कोविड-19विषयीच्या शंका, लक्षणे, जवळच्या चाचणी केंद्राचा किंवा सरकारी रुग्णालयाचा तपशील नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे, तसेच ताण, चिंता किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे पीडित लोकांना मदत केली जाणार आहे. जनरल फिजिशिअन, मानसशास्त्रज्ञ, रेस्पिरेटरी फिजिशिअन व सायकॉलॉजिस्ट यांच्या टीमची मदत असणारी ही हेल्पलाइन मोफत सल्लासेवा देणार आहे आणि कोविड-19विषयी शंकांची उत्तरे देणार आहे. ही सेवा मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी या भाषांमध्ये दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना, लुपिनचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गुप्ता यांनी सांगितले, “सध्या लॉकडाउन सुरू असल्याने बहुतेक लोकांना डॉक्टरना भेटण्यासाठी किंवा स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या आरोग्याविषयी शंका दूर करण्यासाठी घराबाहेर जाणे शक्य नाही. यामुळे त्यांचा ताण वाढतो आहे. आम्ही मुंबईतील रहिवाशांसाठी ही हेल्पलाइन सुरू करून, कोविड-19शी लढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. जन कोविड हेल्पलाइन एकंदर, श्वसनविषयक व मानसिक लक्षणे यांची माहिती देणार आहे. लोकांना कोणताही सल्ला हवा असल्यास किंवा शंकांचे निरसन करायचे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी या सेवेचा वापर करावा.”