News Flash

जनशताब्दी एक्स्प्रेस करमाळीऐवजी मडगावपर्यंत धावणार

कोकणात जाण्यासाठी अत्यंत जलद म्हणून ओळखली जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आता करमाळीऐवजी थेट मडगावपर्यंत चालवण्यात येणार आहे.

| March 18, 2015 12:02 pm

कोकणात जाण्यासाठी अत्यंत जलद म्हणून ओळखली जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आता करमाळीऐवजी थेट मडगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. याआधी ही गाडी मडगावपर्यंतच चालवली जात होती. मात्र काही महिन्यांपासून ही गाडी करमाळी येथेच थांबवण्यात येत होती. आता २६ मेपासून ही गाडी पुन्हा एकदा मडगावपर्यंत धावेल.    १२०५१ दादर-मडगाव ही गाडी दादरहून सकाळी ५.२५ वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी १४.१० वाजता मडगावला पोहोचेल. तर १२०५२ मडगाव-दादर ही गाडी मडगावहून दुपारी १४.३० वाजता निघून रात्री ११.०५ वाजता दादरला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:02 pm

Web Title: janshatabdi express to run till madgaon
Next Stories
1 वा रुग्णालयात डॉक्टरांचे आंदोलन
2 राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा अर्थसंकल्प – फडणवीस
3 अर्थसंकल्पात मुंबईकडे दुर्लक्ष, शिवसेनेची नाराजी
Just Now!
X