27 September 2020

News Flash

जावा मोटरसायकलनी मुंबईत उघडल्या चार शोरूम

गडद रंगातील लाकडी जोडणी, सुक्ष्म बारकावे, रॉ टेक्सचर्स आणि कापडाची विंटेज ऑक्सब्लड शिवण

पुण्यानंतर जावा मोटरसाकलचे मुंबई शहरांमध्ये चार शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. भूल घालणारे तगडे रूप आणि अभिजात दर्जा लाभलेली ‘जावा’ ही दुचाकीची नाममुद्रा तोच जुना रोमांच, परंतु नवीन साज-सामान आणि वैशिष्टय़ांसह मुंबईत नव्याने गुरुवारी सादर झाली.

गडद रंगातील लाकडी जोडणी, सुक्ष्म बारकावे, रॉ टेक्सचर्स आणि कापडाची विंटेज ऑक्सब्लड शिवण अशा वैशिष्ट्यांमधून कलाकुसर आणि साहित्यातील प्रामाणिकपणा जपणाऱ्या सुवर्ण काळाची सफर घडवणारी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचवेळी, क्लासिक डिझाइनमधील आधुनिक दृष्टिकोन आणि त्याला देण्यात आलेली आधुनिक इंजिन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांची जोड यामुळे ही मोटरसायकल समकालीनतेत भर घातले. आख्यायिका आणि मोनोक्रोम लाइफस्टाइलची झलक दृश्यस्वरुपात मांडली जावी यासाठी ही समकालीन क्लासिक जावा मोटरसायकल सादर करताना डिझाइनिंगला अनेक आयाम देण्यात आले आहेत. मग ते मुक्तपणे होणाऱ्या संवादासाठीचे मोठे, अनेकांना सामावून घेणारे टेबल असो, चोखंदळ वाचकांसाठी बारकाईने तयार केलेले पुस्तकांचे कपाट असो की संगीतप्रेमींसाठी मागे सुरू असलेले क्लासिक रॉक असो, हाडाचा मोटरसायकलिस्ट असो किंवा मोटरसायकलिंगच्या जगात सामावून जाण्याची इच्छा असणारी तरुण व्यक्ती असो हे स्टोअर प्रत्येकालाच आपलेपणाची भावना देते.

क्लासिक लेजंड्स प्रा. लिमिटेड’चे सह-संस्थापक तसेच संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार (फि कॅपिटल) अनुपम थरेजा; अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रुस्तमजी ग्रुप बोमन इराणी आणि क्लासिक लेजंड्स प्रा. लिमिटेड’चे चीफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर आशीष जोशी यांच्या हस्ते दालनांचे उद्घाटन करण्यात आले. भारतात दिल्ली-एनसीआर, पुणे, बंगळूरू, नाशिक आणि देहरादून येथील पंधरा नव्या विक्रेत्यांसमवेत क्लासिक लेजंड्सच्या वतीने वांद्रे, चेंबूर, वाशी आणि ठाण्यातही दालने खुली करण्यात आली. ही नवी विक्री दालने खालील ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत.

मुंबईतील जावा शोरूम –

वांद्रे : के. के. मोटर्स – बिल्डींग नं 264, तळमजला, ब्ल्यू हेवन बिल्डींग, 30वा रस्ता, टीपीएस लेन, तृप्तीच्या मागे, वांद्रे (पश्चिम)

चेंबूर: युवराज मोटर्स- शॉप नं 4 आणि 5 तळमजला, श्रीपाल बिल्डींग, छाया को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, व्ही. एन. पुरव मार्ग, चेंबूर

वाशी: आरव ऑटोमोबाईल्स – शॉप नं 5 ते 11, तळमजला, यशवंत आर्केड सीएचएस लिमिटेड. प्लॉट नं. 56-58, 90, सेक्टर 6, कोपरखैरणे, नवी मुंबई

ठाणे: युवराज मोटर्स- झेड-5, फ्लॉवर व्हॅली शॉपिंग कॉम्पलेक्स, इस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्विस रोड, ठाणे (प)

किंमत – 
दी जावा – 1.65 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा 42 – 1.56 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

Jawa Motorcycles स्पेसिफिकेशन्स
सहा गियरबॉक्स
इंजन 293सीसी
लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर
डीओएचसी (डुअल ओवरहेड कॅमशाफ्ट)
गोल हेडलाइट
डिसपर्शन स्टाइलमध्ये लेन्
डुअल डिस्क ब्रेक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 6:16 pm

Web Title: jawa dealerships to open next in mumbai jawa motorcycle showroom in mumbai
Next Stories
1 अखेर गावठाणांचे भूमापन
2 टोमॅटोचे घाऊकमध्ये दर उतरूनही किरकोळीत लूट
3 विमानतळ धावपट्टीच्या कामाला सुरुवात!
Just Now!
X