News Flash

जयंत पवार यांना पत्रकार म्हणून डावलले!

जयंत पवार यांच्या अभिवादन सभेत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

जयंत पवार यांना पत्रकार म्हणून डावलले!

अभिवादन सभेत संध्या पवार यांची खंत

मुंबई : लेखक, नाटककार, समीक्षक, कथाकार म्हणून आपण त्यांना नावाजले, पण ते एक उत्तम पत्रकार आणि संपादकही होते हेदेखील विसरून चालणार नाही. त्यांच्यातल्या पत्रकाराला कायमच डावलले गेले, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांच्या पत्नी संध्या नरे-पवार यांनी व्यक्त केली. जयंत पवार यांच्या अभिवादन सभेत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

‘इथे जमलेला प्रत्येक जण म्हणतो आहे की जयंतकडे वेगळी नजर होती. ते लेखक होते म्हणून ती नजर नव्हती तर ती पत्रकाराची नजर होती. शोषितांचे दु:ख, त्यांचे प्रश्न त्यांनी अचूक हेरले आणि त्यावर आवाज उठवला. त्यांच्यात पत्रकारिता भिनली होती म्हणून सामान्य जनतेचे दुखणे त्यांना दिसू शकले. पण त्यांच्यातल्या पत्रकाराला कधीही पाठबळ मिळाले नाही. ते कदाचित एक धाडसी संपादक होऊ शकले असते, पण समीक्षेपलीकडे त्यांना कधीही काही लिहू दिले नाही. एक नाटककार असलेल्या पत्रकाराच्या वाट्याला एखादे सदरही येऊ नये याचे दु:ख मला कायमच आहे, अशा शब्दात संध्या यांनी जयंत पवार यांच्यातल्या पत्रकाराला अभिवादन केले. ‘कर्करोगाच्या आजारात त्यांनी अफाट वेदनांचा प्रवास केला. अशा वेदनेतही ते लिहीत होते. त्यांनी खूप घाव सोसले पण ते बळकट होते, शेवटपर्यंत खंबीर राहिले,’ असेही त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांचे २९ ऑगस्ट रोजी निधन झाले. साहित्यापलीकडे अनेक चळवळींशी ते जोडले गेले होते. त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने शनिवारी अभिवादन सभा आयोजित क रण्यात आली होती. ‘नाटकांतून भूमिका मांडणे हे कठीण असते. त्यातही प्रस्थापित व्यवस्थेला धक्का लावून अनेक धाडसी विषय जयंत यांनी मांडले.  लेखनाची अनेक माध्यमे ते सहज पेलत होते. त्यांना योग्य वाटेल तिथे त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या कलाकृतींवर अनेक टीका झाल्या पण ते डगमगले नाहीत,’ असे ज्येष्ठ रंगकर्मी शफाअत खान म्हणाले.  मंगेश कदम, विजय केंकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

‘संघर्षाच्या काळात अशा व्यक्तीचे जाणे हे चटका लावणारे आहे, त्यांचे लेखन अनुभवातून यायचे.  येत्या काळाला त्यांची गरज होती. सांस्कृतिक दहशतवादाला त्यांनी वाचा फोडली. अनेक चळवळी त्याच्या पुढाकाराने यशस्वी झाल्या,’ असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2021 1:05 am

Web Title: jayant pawar journalist author playwright reviewer narrator akp 94
Next Stories
1 आजपासून कोकणात जाणाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक
2 नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी
3 ‘माझा डॉक्टर’ परिषद आज