गेल्या काही दिवसांपासून सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि राज्याच्या सुरक्षितेसाठी महत्वाच्या अशा दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक जयजित सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या नाराजीचा धनी ठरलेले देवेन भारती यांची राज्य कामागार सुरक्षा महामंडळात पाठवणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पोलिस दलात फेरबदलाचे आदेस दिले. गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी पाहणारे देवेन भारती यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार नाराज होते. त्यातूनच काही दिवसांपूर्वी त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.वज आज त्यांची दुय्यम पदावर बदली करण्यात आली. याशिवाय प्रभात कु मार यांची लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाच्या अप्पर महासंचालकपदी तर नवल बजाज यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितेश कौशिक यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या सह आयुक्तपदी, संजय मोहीते यांची कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून, राजवर्धन यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.