25 November 2020

News Flash

जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी

विद्यार्थ्यांच्या प्रवासातील मोठा अडथळा दूर

जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोरील सर्वात मोठी अडचण दूर झाली असून प्रवासासाठी रेल्वेसेवा उपलब्ध असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. विद्यार्थी विशेष उपनगरीय रेल्वेतून प्रवास करु शकतात असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील मोठा अडथळा दूर झाला असून मुंबई लोकलने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी मुंबई आणि नवी मुंबईतील २० हजार २५६ आणि ठाण्यातील ७१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. देशभरात १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या परवानगीनंतर सप्टेंबर महिन्यात पार पडणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षेच्या उमेदवारांना विशेष उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी परवानगी देताना अ‍ॅडमिट कार्ड तपासलं जाणार आहे. अ‍ॅडमिट कार्ड तपासल्यानंतरच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पालकांना परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. यासंबंधी रेल्वे स्थानकं आणि तिथे तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त काऊंटर सुरु केले जाणार आहेत.

परिपत्रकात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विद्यार्थी वगळता इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान करोनाशी संबंधित सर्व सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 9:11 pm

Web Title: jee neet candidates are permitted to travel in special suburban services sgy 87
Next Stories
1 “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, राम कदमांच्या मागणीवर कंगनाचं उत्तर
2 राज्यातील रुग्णवाढ चिंताजनक
3 जेईई परीक्षार्थीच्या मदतीसाठी ‘आयआयटी’चे विद्यार्थी सरसावले
Just Now!
X