28 September 2020

News Flash

‘जेट’च्या कर्मचाऱ्याची नालासोपाऱ्यात आत्महत्या

शैलेंद्र यांना कर्करोग झाला होता. त्यात त्यांची आर्थिक तंगी सुरू होती.

संग्रहित छायाचित्र

आर्थिक डबघाईमुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या नालासोपाऱ्यातील एका कर्मचाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्करोगाच्या आजारामुळे आर्थिक तंगी जाणवत असल्याने हा कर्मचारी तणावात होता. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या ४५ वर्षीय शैलेश सिंग यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शैलेश जेटमध्ये सीनियर टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. आर्थिक तंगीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा जेटच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र यांना कर्करोग झाला होता. त्यात त्यांची आर्थिक तंगी सुरू होती. त्यामुळे तणावात असलेल्या शैलेंद्र यांनी शनिवारी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

शैलेश सिंह यांच्यामागे पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 8:35 pm

Web Title: jet airways employee commits suicide in maharashtras palghar
Next Stories
1 अजान सुरू होताच राहुल गांधींनी भाषण थांबवले
2 Good News! पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ
3 नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरेंचे दुकान बंद, मुख्यमंत्र्यांचा टोला
Just Now!
X