News Flash

‘जेट’ अखेर जमिनीवर; डीजीसीआयच्या कारवाईनंतर प्रवाशांचा खोळंबा

या प्रवाशांना जेटच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने ते वैतागले आहेत.

तांत्रिक बाबींवरुन जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्सने (डीजीसीआय) रोखली आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

जेट एअरवेज ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचणीच्या गर्तेत अडकली आहे. त्यामुळे कंपनीला डीजीसीआयने तांत्रिक मुद्द्यांवरुन विमान उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काल (गुरुवार) रात्रीपासून जेटची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली आहे. त्यातच उड्डाणांबाबत या प्रवाशांना जेटच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने ते वैतागले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची दखल केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली आहे.  यासंदर्भात ट्विट करुन त्यांनी या प्रश्नाचा आढावा घेण्याच्या सूचना नागरी वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना दिल्या आहेत. प्रवाशांच्या अडचणी कमी करण्याच्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 8:40 am

Web Title: jet airways passengers detention dgci stopped the flight from the night
Next Stories
1 मुंबई, पुण्यात दमाग्रस्त बालकांमध्ये वाढ
2 किनारा मार्गाच्या भरावाला स्थगिती
3 ‘हिमालय’ दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी
Just Now!
X