26 May 2020

News Flash

खाऊखुशाल : बर्गरची ‘प्रयोगशाळा’

विशेष म्हणजे सांगलीचा मराठमोळा तरूण जिमि भोरे याचा शिलेदार आहे.     

चांगल्या पदार्थांची व्याख्या करताना आपल्याकडे पिझ्झा आणि बर्गर या दोन पदार्थांना ब्लॅकलिस्ट केलं जातं. या पाश्चत्य पदार्थांनी भारतीय लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडवल्या आहेत असे ताशेरे ओढले जातात. पण जगभर मोठय़ा आवडीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आरोग्याला खरंच वाईट आहेत का?  फास्ट फूडमध्ये गणल्या गेलेल्या बर्गरची गोष्टही गेल्या चार-पाच वर्षांत बदलली आहे. खवय्ये बर्गरकडे फक्त परदेशी पदार्थ म्हणून पाहत नाहीत तर पोट भरणारा, वेगळी चव देणारा आणि मेहनत घेऊन सजविलेला पदार्थ म्हणून पाहतात. याच पार्श्र्वभूमीवर बाजारपेठेत परदेशी जॉईंट्सची मोठी स्पर्धा समोर असतानाही गेल्या दोनच वर्षांत आपलं वेगळं अस्तित्त्व निर्माण करणा-या ‘जिमिज बर्गर’ची दखल घेणं गरजेच आहे. विशेष म्हणजे सांगलीचा मराठमोळा तरूण जिमि भोरे याचा शिलेदार आहे.

जिमिला लहानपणापासूनच बर्गर आवडायचा. झिग्निमा नावाच्या हेव्ही मेटल बँन्डमध्ये गाणा-या जिमिचा महाविद्यलयीन शिक्षण संपल्यावर शोजसाठी जगभर प्रवास झाला. तेव्हा बर्गरची ही आवड आणि वेड आणखीनच वाढत गेलं. शेवटी २०१२ साली जिमीने आपली कॉर्पोरेटमधील नोकरी सोडली आणि तो आपल्या मूळ गावी सांगलीला परतला. तरूणाई आणि नव्याने उभ्या राहणा-या महाविद्यलयांसाठी काहीच असं वेगळं खायला मिळत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे सांगलीतच जिमिने बर्गर जॉईंट सुरू करण्याचं ठरवलं. एका वडापावच्या गाडीवर दोन आठवडे कामही केलं. त्यानंतर स्वत:च्या दुकानासाठी जागा शोधली पण सापडली नाही. मग जिमिने चक्क ढकलगाडीवर बर्गर विकायला सुरूवात केली. चिकन, व्हेज, एग बर्गर आणि चीज टोस्ट असे चारच पदार्थ तो गाडीवर विकायचा. बघता बघता संपूर्ण सांगलीत त्याची हवा झाली आणि तिथून थेट त्याने गाठली मायानगरी मुंबई. तिथून सुरू झालेला हा प्रवास आता मुंबईच्या दोन आऊटलेटपर्यंत येऊन पोहोचला आहे. गेली दोन वर्ष मालाड (मूव्ही टाईम सिनेमाच्या समोर) आणि नुकत्याच सुरू झालेल्या अंधेरी येथे जिमिने स्वत: तयार केलेले बर्गर चाखायला खवय्यांची झुंबड उडालेली असते.

हॅन्डक्राफ्टेड बर्गर ही जिमिज बर्गरची खासियत आहे. इथे कुठलाही बर्गर मेकॅनिकली तयार होत नाही. खूप रिसर्च करून जिमीज बर्गरचे चविष्ठ सॉस तयार करण्यात आले आहेत. आपल्याला बर्गर म्हणजे एकावर एक ठेवलेले पदार्थ वाटत असले तरी इथे प्रत्येक बर्गर तयार करण्याची एक पद्धत आहे. कोणत्या पदार्थाच्यावर काय ठेवायचं हे ठरलेलं आहे. कारण त्याची मांडणी त्यापद्धतीने झाली तरंच तुम्हाला अपेक्षित चव अनुभवता येऊ शकेल. म्हणूनच जिमिचे बर्गर वेगळे ठरतात. बर्गर हा हातात न मावणारा आणि संपूर्ण तोडं उघडूनही बाईट घेता येऊ नये असाच असला पाहिजे, तरंच तो लोकांना आवडतो. ‘जिमिज बर्गर’चे जॉब्रेकर याच पठडीतले आहेत. क्लासिक, डबल थ्रेट, हायब्रीड, सेव्हन इंचर आणि जॉब्रेकर केक असे पर्याय यामध्ये आहेत. प्रत्येक बर्गरमध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार पॅटीस स्लाईस, चीज, सलाड, सॉस, सलामी, बेकन असे एकाहून एक सरस पदार्थांचा भरणा असतो. जॉब्रेकर केक ह्य बर्गरची ऑर्डर एक दिवस आधी द्यवी लागते. तुमच्या जबडय़ाच्या आकार नेमका किती आहे याचा अंदाज हा बर्गर खाल्लय़ावर नक्कीच येऊ शकेल. दीड हजार रूपयांचा हा बर्गर इथे उपलब्ध असेलल्या विविध पर्यायांच्या कॉम्बिनेशनमधून तुमच्या मागणीनुसार तयार करून मिळतो. क्लासिक बर्गरमध्ये चिकन, टेंडरलोईन आणि पोर्क अस तीन पर्याय आहेत. मॉडर्न बर्गरमध्ये अल्टीमेट एग, द एपिक ऑल डे ब्रेकफास्ट, स्टफ हर्ब चीज चिकन, क्रंची फ्राईड चिकन, कोरीझो पोर्क-चेड्डर, हवाईअर टेंडरलोईन हे पर्याय आहेत. व्हेज बर्गरमध्येही बार्बेक्यू पनीर अ‍ॅन्ड बेल पेपर, क्लासिक व्हेज, चीज टीज, व्हेज जॉब्रेकर इतकी व्हरायटी आहे. एग, चिकन, मटण, बीफ, पोर्क याच्या एकाचवेळी सारख्याच पॅटीस तयार केल्या जात नाहीत. तर प्रत्येक बर्गरच्या नावाप्रमाणे त्यातील पॅटीसही वेगळ्या पद्धतीने तयार केल्या जातात. एकशेवीस रूपयांपासून ते सहाशे रूपयांपर्यंतचे बर्गर येथे आहेत.

बर्गरशिवाय रेग्युलर फ्रेंच फ्राईज, ओनिअर रिंग्ज, पोटॅटो वेजेसही आहेत. त्याशिवाय मोठय़ा हिरवी मिर्चीमध्ये दाबून भरलेल्या चीज आणि नंतर डीप फ्राय केलेलं जलपिनो पॉपर आणि मॉझेला चीज स्टीक विथ पिझ्झा सॉस हे लोकांच्या खास आवडीचं आहे. जिमिजचे चिकन विंग्ज बॅटरलेस आहेत. ते थेट फ्राय केले जातात आणि नंतर त्यावर जिमिच्या खास मसाल्यांची पखरण केली जाते. अंधेरीच्या नवीन आऊटलेटमध्ये आता फिश फ्राय आणि चीप्सही खायला मिळणार आहेत. तसंच मटण आणि फिश बर्गरही अंधेरीच्या आऊटलेटमध्ये खायला मिळतील. खाण्यासोबत पिण्याचेही पर्याय आहेत. त्यामध्ये स्पाईस लेमनेड, ग्रीन अ‍ॅप्पल कूलर (यामध्ये व्हेनिला असतं), चिली जिंजर स्लश, नटेला ओरीओ शेक वेगळे आहेत. लवकरच जिमि चॅलेंज बर्गर घेऊन येणार आहे,  तुम्ही किती तिखट खाऊ शकता, किती प्रमाणात खाऊ शकता आणि किती कमी वेळात खाऊ शकता, हे अशाप्रकारचं चॅलेंज असेल. तुम्ही बर्गरचे चाहते असाल आणि प्रयोगशील, चविष्ट बर्गर खायचे असतील तर ‘जिमिज बर्गर’ला एकदातरी भेट द्ययलाच हवी.

जिमिज बर्गर

  • कुठे – शॉप बी२, श्री सिध्दिविनायक प्लाझा, ऑफ न्यू लिंक रोड, सिटी मॉल समोरच्या गल्लीत, वीरा-देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पष्टिद्धr(१५५)म, मुंबई – ४०००५३
  • कधी – दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत.

@nprashant

nanawareprashant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2017 3:07 am

Web Title: jimis burger andheri different burger burger special
Next Stories
1 ‘मुंबईचा राजा’ बनण्यासाठी गणेश मंडळे सज्ज
2 दलित, आदिवासी, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
3 मंडप परवानगीबाबत पालिका-पोलिसांचे एकमेकांकडे बोट
Just Now!
X