News Flash

“प्रिय अण्णा…. ” जितेंद्र आव्हाडांंनी हजारेंना दिल्या हटके शुभेच्छा!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना चिमटा घेत शुभेच्छा दिल्या.

“प्रिय अण्णा…. ” जितेंद्र आव्हाडांंनी हजारेंना दिल्या हटके शुभेच्छा!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस आहे. अनेक राजकिय नेत्यांनी अण्णा हजारे यांना शुभेच्छा दिल्या. अण्णा हजारे आणि आंदोलन हे समीकरण फार मिळत जूळत आहे. तत्कालीन यूपीए सरकार असतांना अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलने केली. महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी हे त्यांच्या आंदोलनाचे मुख्य विषय होते. जंतर-मंतर वर त्यांनी केलेल्या उपोषणामुळे काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर भाजपा सेत्तेत आल्यानंतर आण्णांची भुमिका बदलली का? अशी टीका त्यांच्यावर सतत होत असते. दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना चिमटा घेत शुभेच्छा दिल्या.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रिय अण्णा…. प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांबद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता #HappyBirthdayAnna”

 

या शुभेच्छा राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सतत सामाजीक प्रश्नांवर आंदोलनाचे ह्त्यार उपसणारे अण्णा हजारे आता गप्प का, असे लक्षात आणून देण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरीत्या केले आहे.

हेही वाचा- “…म्हणून कारने आत्महत्या केली”; जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारला लगावला टोला

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. पेट्रोलचे दर देखील गगनाला भिडले आहेत.त्यामुळे विरोधी नेते केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपावर टीका करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 12:58 pm

Web Title: jitendra awhad wished anna hazare his birthday uniquely srk 94
Next Stories
1 सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असेपर्यंत आघाडीला धोका नाही – अजित पवार
2 रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन; पोलीस अधिक्षकांची कारवाई
3 सर्वांचा मान राखून आणि करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करुन आंदोलन करुया, संभाजीराजेंचं आवाहन
Just Now!
X