News Flash

महाराष्ट्राने नायक म्हणून दर्जा दिला -जितेंद्र कपूर

महाराष्ट्रात जन्म झाला नसूनही महाराष्ट्राने मला नायकाचा दर्जा दिला.

जितेंद्र कपूर

महाराष्ट्रात जन्म झाला नसूनही महाराष्ट्राने मला नायकाचा दर्जा दिला. चाळीत राहणाऱ्या मुलाला नायकाचे पद बहाल केले, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र कपूर यांनी काढले.
५३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी बोरिवलीच्या अरुण कुमार वैद्य मैदानात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संकलक व्ही. एन. मयेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, जितेंद्र कपूर यांना राजकपूर जीवन गौरव पुरस्कार, अनिल कपूर यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार, तर अलका कुबल यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप तीन लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे होते. यावेळी सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘रिंगण’ चित्रपटाने बाजी मारली.महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांच्या नावाने चित्रपट संग्रहालय उभारण्याची घोषणा यावेळी केली.यावेळी व्ही. एन. मयेकर, अलका कुबल,अनिल कपूर यांनी पुरस्काराबद्दल आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 2:40 am

Web Title: jitendra kapoor
Next Stories
1 चंदनवाडी विद्युतदाहिनी ९ जुलैपर्यंत बंद
2 धडा शिकविण्यासाठीच ‘आदर्श’ पाडण्याचा आदेश
3 ‘बेस्ट’चे ५२ बसमार्ग बंद होऊ देणार नाही
Just Now!
X