News Flash

खासगी प्रॅक्टिस केल्यामुळे ‘जे. जे’. तील डॉक्टर निलंबित

खासगी प्रॅक्टिसवर बंदी घातलेली असतानाही दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयात काम करत असलेल्या जे. जे. रुग्णालयाच्या हृदयविकार विभागप्रमुखांना वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निलंबित

| June 1, 2015 02:55 am

खासगी प्रॅक्टिसवर बंदी घातलेली असतानाही दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयात काम करत असलेल्या जे. जे. रुग्णालयाच्या हृदयविकार विभागप्रमुखांना वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निलंबित केले.
जे.जे.रुग्णालयामधील हृदयविकार तज्ज व विभागप्रमुख एन. ओ. बन्सल खासगी रुग्णालयात काम करत असल्याचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांच्या लक्षात आले. यासंबंधीचा अहवाल त्यांनी ९ जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांच्याकडे दिला. या अहवालासोबत खासगी रुग्णालयातील डॉ. बन्सल यांची स्वाक्षरी असलेली कागदपत्रेही शिणगारे यांच्याकडे सोपवण्यात आली. डॉ. लहाने यांच्या प्राथमिक अहवालानुसार डॉ. बन्सल यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविण्यात आली. तीन वेळा नोटीस पाठवूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डॉ. बन्सल यांच्या निलंबनाबाबता प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आलेल्या प्रस्तावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बन्सल यांच्या निलंबनाला होकार दिला.
बन्सल यांनी तीनही नोटीसना उत्तर दिले होते. खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत असल्याबाबत त्यांनी नकार दिला होता. दक्षिण मुंबईतील रुग्णालयात इमर्जन्सीमध्ये एका रुग्णाला पाहिल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र माणुसकीच्या भावनेतून ही कृती झाली असून खासगी रुग्णालयात काम करत असल्याचा अर्थ त्यातून काढता येणार नाही, असे त्यांनी स्पष्टीकरणात म्हटल्याचे सूत्रांकडून समजले. मात्र हे स्पष्टीकरण अमान्य करत डॉ. बन्सल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 2:55 am

Web Title: jj hospital doctor suspended over private practice
Next Stories
1 पालिकेतील निवृत्तांची ‘विशेष कार्य अधिकारी’ सेवा आजपासून संपुष्टात
2 व्हिडिओ : आंब्याची खोकी आगीपासून दूर का ठेवावीत?
3 ‘टाईमपास’ फेम प्रथमेश परब, विशाखा सुभेदार यांना म्हाडाचा जॅकपॉट
Just Now!
X