करोनामुळे मृत्यू झाल्यास एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावरही नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय याआधी मुंबईतील बेस्ट उपक्रमानेही घेतला आहे.

कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा शासनाचा नियम आहे. याची अंमलबजावणी एसटीकडून केली जात आहे. आतापर्यंत एसटीत ३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यातील पाच कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आर्थिक मदतीसाठी दावा केला आहे.

करोनामुळे मृत्यू झालेल्या एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. आर्थिक मदतीचा लाभ केवळ कर्तव्यावर असताना करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळेल, असेही चन्ने यांनी स्पष्ट केले.