01 October 2020

News Flash

ऑनलाइन भेटवस्तूंच्या नावाखाली दत्तक मुलांची चेष्टा

अ‍ॅमेझॉनविरोधात तीव्र नाराजी; तरी अद्याप विक्री सुरूच

संग्रहित छायाचित्र

दत्तक मूल या संकल्पनेचा वापर करून भावना दुखावणारी वाक्ये लिहिलेल्या भेटवस्तू ‘अ‍ॅमेझॉन’ या संकेतस्थळाने यंदा रक्षाबंधनासाठी विक्रीला ठेवल्या. या वस्तूंबाबत अनेक सामाजिक संस्था आणि पालकांनी आक्षेप घेऊनही अद्याप त्या वस्तू संकेतस्थळावरून उपलब्ध असल्याने अ‍ॅमेझॉनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अनेकदा मोठय़ा भावंडांकडून कुटुंबातील शेंडेफळांची  ‘तुला दत्तक घेतले गेले आहे’, असे सांगत थट्टा केली जाते. ही थट्टा घराघरांमध्ये हसण्यावारी घेतली जाते. पण खरोखरीच दत्तक घेतलेल्या मुलांसाठी अशी वाक्ये भावना दुखावणारी ठरतात. नेमका हाच प्रमाद रक्षाबंधनासाठी भेटवस्तू तयार करणाऱ्यांकडून घडला आहे.

अ‍ॅमेझॉनने केलेली ही कृती अतिशय असंवेदनशील असल्याची भावना ‘पूर्णाक’ संस्थेच्या संगीता बनगीनवार यांनी व्यक्त केली. अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळाशी संपर्क  साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आणि विक्री सुरूच ठेवली.

वाद कशामुळे?

भावा-बहिणीच्या खेळकर नात्याचे प्रतीक म्हणून काही भेटवस्तू अ‍ॅमेझॉनने रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीपासून विक्रीसाठी ठेवल्या. त्यात उशी, कॉफी मग आणि इतर वस्तू असून त्यावर दत्तक मुलांविषयी आक्षेपार्ह वाक्ये लिहिण्यात आली आहेत. ‘तुला कचराकुंडीतून उचलून आणलंय’,  ‘तू आई-बाबांचा दत्तक मुलगा आहेस’, अशा वस्तूंवरील वाक्यांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मुले दत्तक देणाऱ्या संस्थांनी आपला आक्षेप नोंदवूनही अद्याप या वस्तूंची विक्री बंद करण्यात आलेली नाही.

दत्तक मूल ही कुटुंब घडवण्यासाठी खूप सक्षम संकल्पना आहे. त्यामुळे दत्तक मुलांविषयी समाजाने आदर बाळगायला हवा. ही संकल्पना भारतीय पालकांनी स्वीकारावी यासाठी आम्ही वर्षांनुवर्षे काम करत आहोत. यासाठी गेल्या २५ वर्षांत ४० हून अधिक कार्यशाळा आम्ही घेतल्या आहेत. दत्तक मूल व पालक यांच्यातील नाते सक्षम करण्यात अनेक वर्षांची मेहनत असते. मुलांना त्यांच्या दत्तकत्वाविषयी माहिती देण्यास आम्ही कुटुंबांना सांगतोच. पण कोणत्याही संकेतस्थळाने या नात्यावर विनोद करणे अगदी चुकीचे आहे.

–  सुनील अरोरा, ‘बालआशा ट्रस्ट’चे संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:13 am

Web Title: jokes of adopted children in the name of online gifts abn 97
Next Stories
1 बळीराजा चेतना योजना रद्द
2 ‘एसटी’ला पावसाचा फटका
3 घर खरेदी-विक्रीद्वारे मिळणाऱ्या महसुलात ५० ते ६० टक्के घट!
Just Now!
X