News Flash

खंडणीखोर पत्रकाराला अटक

सोडती चालविणाऱ्या व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या राजेश पवार या एका साप्ताहिकाच्या पत्रकाराला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.

| August 20, 2013 03:20 am

सोडती चालविणाऱ्या व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या राजेश पवार या एका साप्ताहिकाच्या पत्रकाराला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवापर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका सोडत विक्रेत्याने राजेश हा खंडणी मागत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी सापळा लावून सोमवारी राजेश अटक केली. तो विक्रेत्यांना आपल्या बँकेतील खात्यात थेट दहा हजार रुपये जमा करण्यास सांगत असे. त्याच्या बँक खात्यात ५८ हजार रुपयांची रक्कम सापडली आहे.
अंधेरी, घाटकोपर, डोंबिवली परिसरातील सोडती विक्रेत्यांच्या राजेशविरुद्ध तक्रारी असल्याचे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. राजेशच्या साप्ताहिकाची नोंदणी रद्द करावी, यासाठी रजिस्ट्रेशन ऑफ न्यूज पेपरला पत्र देण्यात आले आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2013 3:20 am

Web Title: journalists arrested on extortion charges
टॅग : Journalists
Next Stories
1 ‘कॅम्पा कोला’ प्रकरण : विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा
2 … मग जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर का केले नाही – राज ठाकरे
3 याही वेळी ड‘राव’ ड‘राव’च!
Just Now!
X