मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व सतीश तारे यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले आणि अवघी मराठी कला सृष्टी हेलावली. विनोदाचा हुकमी एक्का म्हणून प्रसिद्ध झालेला हसरा चेहरा अखेर रडवून गेला.. या विनोद सम्राटाच्या कारर्कीदीवर टाकलेली एक नजर
* लहान असतानाच बालनाट्याच्या माध्यमातून तारेंनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. मुख्यम्हणजे सतीश तारे यांना वडील जयंत तारेंसोबत एका बालनाट्यातून अभिनय क्षेत्रात आपले कसब आजमवायची संधी मिळाली आणि येथूनच तारेंच्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात झाली
* सतीश तारेंनी रंगभूमीवर अनेक नाटके गाजवली. आपल्या ‘ऑल टाईम क्लियर’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘जादू तेरी नजर’ या नाटकांतील भूमिकांनी तारेंनी आपली भूमिका बघण्यासाठी अनेक प्रेक्षकांची पावले रंगभूमीकडे वळवली.
* ‘चल घेऊन टाक’, ‘आम्ही बिघडलो’ या नाटकांमधील सतीश तारेंच्या अभिनयाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
* ‘मोरूची मावशी’ हे गाजलेले नाटकही तारे यांनी नव्या संचासह पुन्हा एकदा रंगभूमीवर आणले होते.
* ‘नवरा माझा नवसाचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या चित्रपटांमधूनही सतीश तारे आपल्या चाहत्यांसमोर आले.
* झी-टीव्हीवरील ‘फू-बाई-फू’ कार्यक्रमाच्या माध्यामातून सतीश तारेंनी आपल्या विनोदी अभिनयाच्या ताकदीवर अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी प्रेक्षकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली होती.
* हा हरहुन्नरी अभिनेता फक्त अभिनय क्षेत्राच्या आसपास घुटमळत न राहता. ‘सागेगमप’ च्या माध्यामातून गायन क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली.      
* तारे यांनी या वर्षी रंगभूमीवर पुनरागमन केले होते. त्यांचे सध्या रंगभूमीवर “गोडगोजिरी” हे नवे नाटक सुरू होते. या नाटकाचे काही प्रयोगही झाले होते. यादरम्यान, मधुमेह असल्यामुळे त्यांच्या पायाला गँगरिन झाला व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते आणि अखेरीस आज दुपारी १२ च्या सुमारास या हसऱया चेहऱयांने सर्वांना रडवले.