स्विगी, झोमॅटो ही फूड डिलिव्हरी अॅप सध्या आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. याच स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने एक स्वप्न पाहिलं. उद्योजक होण्याचं हे त्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं आज स्विगी आणि इतर काही कंपन्यांना बॅग पुरवण्याचा व्यवसाय हा उद्योजक करतो. मोहम्मद राफे शेख असं या यशस्वी उद्योजकाचं नाव आहे. त्याच्या हाताखाली आज १८ लोक काम करतात. स्विगीचा डिलिव्हरी बॉय ते एक यशस्वी उद्योजक हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. तुम्हाला आम्हाला येतात तसेच अनुभव आले, अडचणीही आल्या. मात्र त्यापुढे हार न मानता त्याने स्वतःचा व्यवसाय सांभाळला आणि पुढे नेला. स्विगीमध्ये काम करणाऱ्या या आणि आजच्या घडीला एक यशस्वी उद्योजक असलेल्या मोहम्मद राफे शेख यांच्याशी लोकसत्ता ऑनलाईनने या प्रवासाबद्दल जाणून घेतलं. पाहा त्याच संदर्भातला हा व्हिडिओ