शीना बोरा हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जी याला महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी १४ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

शीनाच्या हाँगकाँगमधील बँक खात्याच्या व्यवहाराचा तपशील ‘इंटरपोल’कडून यायचा आहे. शिवाय पीटरने ‘पॉलिग्राफ’ चाचणीमध्ये दिलेल्या उत्तरांची पडताळणी करायची असल्याचे सांगत सीबीआयतर्फे सोमवारी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने त्याच्या कोठडीत एक दिवसांची वाढ केली होती. मंगळवारी ही मुदत संपल्यावर पीटरला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी सध्या तरी पूर्ण झाली असून पीटरला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती सीबीआयतर्फे करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पीटरला १४ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
गेल्या १९ ऑक्टोबर रोजी पीटरला सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्याला चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले. पीटरच्या चौकशीतून त्याने इंद्राणीच्या साथीने परदेशात ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे उघड झाले होते. शिवाय इंद्राणीने शीनाच्या नावे हाँगकाँगमध्ये खाते उघडले होते, हेही पुढे आले.