मुंबईतील १३६ वर्षे जुना हँकॉक पूल येत्या रविवारी म्हणजेच १० जानेवारील पाडला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन एकत्रितपणे हा पूल तोडणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेवर तब्बल १८ तासांचा ब्लॉक असून, तो रविवार सायंकाळी ६.३० वाजता संपुष्टात येईल.
‘इस रूट की सभी लाइने व्यस्त हैं..’
जम्बो मेगाब्लॉक दरम्यान, शनिवार-रविवार मध्यरात्री १२.२० ते रविवार सायंकाळी ६.३० सीएसटी ते भायखळा रेल्वे वाहतूक बंद राहिल. तर मुंबईकडे येणार्‍या लोकल भायखळ्याहूनच परत जातील. तसेच, शनिवारी सीएसटीहून रात्री १२.१० वाजता कसारासाठी शेवटची लोकल सुटेल. तर रात्री १२.३० वाजता सीएसटीहून सुटणारी शेवटची कर्जत लोकल भायखळा येथून सुटेल. पहाटे ४.१२ वा. पासून रेल्वे वाहतूक भायखळा, दादर, कुर्ला येथून सुरू होतील.
या कामामुळे जवळपास १५० फेर्‍या रद्द करण्यात येणार असून शुक्रवार ते रविवार म्हणजेच ८ ते १० जानेवारी या तीन दिवसात लांब पल्ल्याच्या ४२ गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईत रविवारी जम्बो ब्लॉक
* हँकॉक पूल पाडण्यासाठी जम्बो ब्लॉक
* रविवारी पहाटे १२.२० वा. सुरू होणार
* रविवारी संध्याकाळी ६.२० वा. संपणार
* भायखळ्याच्या पुढे लोकल जाणार नाहीत
* लोकलच्या १५० फेर्‍या रद्द
* लोकलच्या ४७६ फेर्‍या भायखळ्याला संपणार
* ४२ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
* हार्बर लाईन सुरू राहणार