News Flash

गृहमंत्र्यांची फक्त विचारणा

सहायक आयुक्त संजय पाटील यांची वरिष्ठांना माहिती

(संग्रहित छायाचित्र)

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना शहरातील १७५० मद्यालयांकडून प्रत्येकी तीन लाख जमा होतात, अशी माहिती मिळाली होती. त्याबाबत देशमुख यांनी विचारणा केली, असे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्याला सांगितले. गृहमंत्री आणि वाझे यांची प्रत्यक्षात भेट झाली होती का? हे माहिती नाही, असा दावा समाजसेवा शाखेचे साहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी केला.

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये दरमहा गोळा करण्याच्या सूचना दिल्याचा आरोपपत्राद्वारे केला होता. या पत्रात त्यांनी वाझे आणि साहाय्यक आयुक्त पाटील यांचा उल्लेख  केला होता.

हे पत्र माध्यमांद्वारे सर्वदूर पसरल्यानंतर गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पाटील यांच्याकडे चौकशी केली. त्यांचा जबाब घेतला. त्यात १ मार्चला अधिवेशनात ठाण्यातील हुक्कापार्लरबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्या अनुषंगाने शहरातील हुक्कापार्लरबाबत माहिती घेण्यासाठी देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावले होते. तेथे अन्य पोलीस अधिकारीही उपस्थित होते. त्याव्यतिरिक्त या कालावधीत किंवा त्याआधीही देशमुख यांच्यासोबत भेट किंवा चर्चा झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच पोलीस आयुक्तालयाच्या आवारात वाझे यांची भेट झाली तेव्हा ते गृहमंत्र्यांना माहिती देण्यासाठी (ब्रीफिंग) भेटले होते. या भेटीत गृहमंत्र्यांनी शहरातील प्रत्येक बार आस्थापनाकडून दरमहा तीन लाख रुपये जमा होतात, अशी माहिती मिळाल्याचे सांगून त्यासंदर्भात विचारणा केली, असे वाझेंनी आपल्याला सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. हीच बाब सिंग यांना व्हॉट्सअपवर सांगितली, अशीही माहिती त्यांनी दिली.

वाझेंच्या चौकशीस सीबीआयला परवानगी

सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या केंद्रीय अन्वेषण पथकाला  विशेष एनआयए न्यायालयाने परवानगी दिली. एनआयएच्या कोठडीत हे पथक वाझेंकडे चौकशी करू शकते, असे निर्देश न्यायालयाने दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:45 am

Web Title: just asking the home minister information of assistant commissioner sanjay patil to seniors abn 97
Next Stories
1 पूर्वेश सरनाईकला कारवाईपासून दिलासा
2 परमबीर यांच्या आग्रहामुळेच वाझेंची नियुक्ती
3 करोना वाढीचा दर १.९१ टक्क्यांवर
Just Now!
X