News Flash

मंजुळा चेल्लूर उद्यापासून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती

राज्यपाल सी. विद्यासागर राव हे सोमवारी चेल्लूर यांना पदाची शपथ देतील.

केरळ आणि कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून धुरा सांभाळल्यानंतर न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर या सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदभार सांभाळणार आहेत. चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेल्या दुसऱ्या महिला न्यायमूर्ती आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी १९९४ मध्ये हे पद सांभाळले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे सोमवारी चेल्लूर यांना पदाची शपथ देतील.

मूळच्या कर्नाटक येथील असलेल्या चेल्लूर यांची फेब्रुवारी २००० मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांची केरळ उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून, तर २६ सप्टेंबर २०१२ रोजी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. चेल्लूर या केरळ उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आहेत. नंतर ६ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

६० वर्षांच्या चेल्लूर यांना निवृत्तीला अद्याप १६ महिने असून त्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची शक्यताही आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. एच. वाघेला हे १० ऑगस्ट रोजी निवृत्त झाले. ते सहा महिन्यांपेक्षाही कमी काळ मुख्य न्यायमूर्तीपदी राहिले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:00 am

Web Title: justice manjula chellur to become new chief justice of bombay high court
Next Stories
1 जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया सुरू
2 भाजपचे कसले बलिदान ?
3 भाजपच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे अभय; खोतकरांची मात्र मागणीवरून चौकशी 
Just Now!
X