31 May 2020

News Flash

न्यायमूर्ती रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदलीची शिफारस

२००६ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

न्यायमूर्ती रणजित मोरे

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य न्यायमूर्तीनंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी गेल्याच आठवडय़ात तडकाफडकी राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे न्या. मोरे हे सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य न्यायमूर्तीनंतरचे तिसऱ्या क्रमाकांचे न्यायमूर्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे येत्या २७ एप्रिलला निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती मोरे यांची मेघालय न्यायालयात बदली करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सरकारकडे केली आहे.

त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. १९८३ मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

महत्त्वाचे निर्णय.. : न्यायमूर्ती मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्याच वर्षी मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला होता. याशिवाय मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेच ‘आदर्श’ सोसायटी बेकायदा ठरवत ती पाडण्याचे आदेश दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 12:48 am

Web Title: justice ranjit more recommends transfer to meghalaya high court zws 70
Next Stories
1 वुहानवरून आलेले ३६ महाराष्ट्रीय परतले
2 सरकारची मोठी घोषणा : विद्यार्थ्यांना ‘ही’ महागडी वस्तू मिळेल मोफत
3 शिवजयंती विशेष: “महाराष्ट्राच्या मालकाचं नाव एकेरी घेणं बंद करा”
Just Now!
X